रणसम्राट सामाजिक संस्थेकडून ‘रणसम्राट युवारत्न पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात
KS News सोलापूर प्रतिनिधी राज लोखंडे
सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रणसम्राट सामाजिक संस्थेच्या वतीने ‘रणसम्राट युवारत्न पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ विजय मराठे, नगरसेवक अमोल बापू शिंदे, नगरसेवक प्रियदर्शन साठे तसेच सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, विधी, कला, आरोग्य, पत्रकारिता आणि पोलीस दल या विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवांना ट्रॉफी, शाल व प्रमाणपत्र देऊन ‘युवारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष दीपक गायगवळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमोल बापू शिंदे, प्रियदर्शन साठे आणि अॅड. विजय मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य आणि देशासाठीचे योगदान यावर सखोल मार्गदर्शन केले.
रणसम्राट युवारत्न पुरस्कार सोहळा-२०२६ : पुरस्काराचे मानकरी
???? आरोग्य विभाग: डॉ. ओंकार मस्के, डॉ. जगदीश पाटील
???? सामाजिक क्षेत्र: आयु. अंबादास पांढरे
???? विधी व न्याय विभाग: अॅड. चेया सापटणेकर, आयु. इंद्रजित वर्धन
???? क्रीडा विभाग: कु. प्रतिक्षा जाधव
???? कला क्षेत्र: आयु. निखिल भालेराव
???? पत्रकारिता विभाग: आयु. सचिन गाडेकर
सूत्रसंचालन वेदपाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन गिरीश उडानशिव यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव मिलिंद ठोंबरे तसेच राजू माने, अॅड. सतीश गायकवाड, प्रमोद मसलखांब, कपिल भालेराव, संजय कांबळे, विलास दुपारगुडे, मलिक शिंदे, विजय वाघमोडे, अविनाश दुणगे, राघू नांदवर, अप्पू पाटील, गौतम साबळे, अरविंद महाले, अॅड. माळसिद्ध देशमुख, भीमा गायगवळी आदींनी परिश्रम घेतले.