समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पिंपरी-चिंचवड : समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ११ मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून PSI चैत्राली भिसे, नगरसेविका अश्विनीताई वाबळे आणि नगरसेविका सीमाताई सावळे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान संस्थेतील महिलांनी पारंपारिक नृत्य, डान्स तसेच फॅशन शो सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.यावेळी प्रज्ञा मनोज जमदाडे व श्रद्धा शिंदे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच संगीता उपरे, लता गोरडे, मीनाक्षी हांडे, शोभा रकिबे, रंजना भैरट, ताराबाई ज्ञानदेव गडाख, नंदा पावसे, मीनल राकसे, छाया बुरडे आणि भारती शेलार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याशिवाय सुप्रिया अनारसे, मनीषा अमृतकर, सोनाली हरणे, जयश्री करगळ, किरण लांडगे, स्मिता औटी, अलका ढोबळे, जिजाबाई शिनगारे, गुलाबाई मल्हार ढोले, प्रिया बोधल, संगीता जाधव, शितल कोठावळे, मेघना बारटक्के, शितल बारस्कर, छाया भुजबळ आणि सविता जोशी यांचा सत्कार करून त्यांचे कार्य गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला तसेच महिलांना समाजात अधिक सक्षमपणे पुढे येण्यासाठी प्रेरणा देण्यात आली. यावेळी विविध बचत गट, भजनी मंडळ तसेच ज्येष्ठ महिला समूह यांचेही सत्कार करण्यात आले.
संस्थेच्या संस्थापिका राजश्री ताई गागरे यांनी उपस्थितांना संस्थेची कार्यप्रणाली तसेच व्यवसायाचे महत्व आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी लोकरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.