खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

KS News सोलापूर | प्रतिनिधी  संदेश कांबळे 

सोलापूरच्या नूतन खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधन विचार मंच, सोलापूर यांच्या वतीने रमाई चौक, आवसे वस्ती व अमराई परिसरात करंजी, सिताफळ, मोगरा, शेवगा, चिंच व जांभूळ आदी विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी डॉ. ज्योतीताई वाघमारे यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशा मंगलकामना व्यक्त करत उपस्थितांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सदर प्रसंगी आयु. विश्वास गायकवाड व आयु. अशोककुमार दिलपाक यांनी सध्याच्या परिस्थितीत वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान एक झाड लावले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

झाडे आपल्याला प्राणवायू देतात, सावली देतात, फळे देतात. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करतो. वृक्षारोपणामुळे पावसाचे प्रमाण वाढण्यास मदत होते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी मंचाचे अध्यक्ष विश्वासभाऊ गायकवाड, अशोककुमार दिलपाक, नागेश गायकवाड, ऋषिकेश माळशिकारे, किरण मोरे, नारायण दुपारगुडे, श्रीकांत कांबळे, अलका गेजगे कसबे, महापालिका आरोग्य विभाग प्रभाग १० चे अधिकारी श्रीकांत विभुते, प्रबोधन गायकवाड, आदित्य नडगम आदी उपस्थित होते.

या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.