महाराष्ट्र राज्याचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री मा. श्री. माणिकराव कोकाटे यांनी नुकतीच पुणे दौऱ्याच्या निमित्ताने GoFarmly ऑफिसला भेट दिली. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या नवकल्पनांची माहिती घेतली आणि GoFarmly तर्फे सुरु करण्यात आलेल्या “कृषी मित्र” या प्रायोगिक प्रकल्पाची पाहणी केली.
या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत डॉ. शंतनू जगदाळे हेही उपस्थित होते. मा. माणिकराव कोकाटे यांनी समर्थ क्रॉप केअर चे संस्थापक डॉ. प्रशांत आशा अनिल गवळी, GoFarmly चे सह-संस्थापक श्री. प्रकाश मंगाणे आणि श्री. सुदाम दाश यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या डिजिटल शेतीसाठी कार्यरत उपक्रमांचे कौतुक केले.
या वेळी GoFarmly ने विकसित केलेले AI तंत्रज्ञानावर आधारित “कृषी मित्र “ हे अॅप GoFarmly च्या टीमने सादर केले. हे स्मार्ट AI मोबाइल अॅप महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधित प्रश्नांना तत्काळ उत्तरं व मार्गदर्शन देण्यासाठी डिझाईन केले आहे.
“कृषी मित्र “अॅपची काही प्रमुख वैशिष्ट्ये:
* शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांना AI Chatbot द्वारे तत्काळ उत्तरं
* पिक निवड व व्यवस्थापनाचे सल्ले
* हवामानाचे थेट अपडेट्स आणि अंदाज
* शासकीय योजनांची माहिती
* कीड नियंत्रण उपाय
* अॅग्री बिझनेस व निर्यात मार्गदर्शन
शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त फायदे:
* दररोजचे बाजारभाव (मंडी रेट्स) व हवामान अपडेट
* नफा-तोटा आणि आर्थिक व्यवहारांची डिजिटल नोंदणी
* निर्यातसक्षम बनण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
मा. माणिकराव कोकाटे यांनी या उपक्रमात रुची दाखवली व “कृषी मित्र “ हे अॅप शेतकऱ्यांना चांगले निर्णय घेण्यासाठी, उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आणि स्मार्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत अॅग्री बिझनेस तयार करण्यासाठी सक्षम करत असल्याचे कौतुकास्पद शब्द काढले.
ही भेट GoFarmly च्या शेतकरी-केंद्रित नवकल्पनांमध्ये यशाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरली असून, भारतीय शेतीचा भविष्यकाल अधिक स्मार्ट आणि सक्षम करण्यासाठी त्यांची बांधिलकी अधोरेखित करते.