डॉ. मैनाक घोष यांनी सांगली जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या हातात जिल्ह्याची सूत्रे!
(सांगली जिल्हा) प्रतिनिधी. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची मुंबईत कृषी औघोगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली असून. जिल्हाधिकारी काकडे हेही सांगलीकरांसाठी नेहमीच प्रयत्नशील ठरले, फेब्रुवारी 2025 पासून सांगली जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या जागी आता नव्याने धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. मैनाक घोष यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून आज पदभार स्वीकारला आहे. डॉ. मैनाक घोष हे 2019 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी यवतमाळ,धाराशिव जिल्हा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे कलकत्ता येथील आहेत. बायोकेमिट्ररी मधून कलकत्ता विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. तर त्यांच्या धाराशिव जागेवर डॉ. प्रियवंदा महाडदळकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. मैनाक घोष यांनी आत्तापर्यंत विविध महत्वाच्या पदांवर काम केले, असून त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा एक दांडगा अनुभव आहे. सांगली जिल्हाधिकारी पदभार घेतल्यानंतर प्रशासनांच्या माध्यमांतून सांगली जिल्ह्यातील विकास-कामांना गती देणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांतून सांगितले आहे. डॉ . घोष यांच्यासमोर महसूल प्रशासन आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. नवे जिल्हाधिकारी सांगली जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला आहे.*