इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त 'हर घर संविधान' उपक्रमांतर्गत संविधान उद्देशिकेचे वाटप.

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त 'हर घर संविधान' उपक्रमांतर्गत संविधान उद्देशिकेचे वाटप.

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून 'हर घर संविधान' या उपक्रमांतर्गत शहरातील मिळकत धारकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या उपक्रमाचा शुभारंभ आज सोमवार दिनांक २२ जून रोजी महापौर उदय धातुंडे आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे तसेच उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, सहा.आयुक्त संतोष जिरगे, सहा.आयुक्त रोशनी गोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

           यावेळी महापौरांनी नागरिकांना भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचा अंगीकार करून संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्यांविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. संविधानाची उद्देशिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून संविधानाबाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

                या प्रसंगी सहा.कर संकलन अधिकारी दिपक खोत, सुशिल पाडळकर यांचेसह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

         नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत संविधान उद्देशिका स्वीकारून संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला.