एन.ए.बी. संचलित ममता मूकबधिर विद्यालय व राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न
KS News सोलापूर प्रतिनिधी संदेश कांबळे
सोलापूर: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित ममता मूकबधिर विद्यालय व राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
योग गुरु सौ. अन्नपूर्णा साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगाचे धडे घेतले. शरीर व मनाच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी ममता मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता गायकवाड मॅडम, राजीव गांधी अंध शाळेचे मुख्याध्यापक श्री. सौरभ शिंगाडे सर तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. मेधा जोशी मॅडम यांनी प्रास्ताविक केले तर सौ. उज्वला पराळे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.